Mon. Aug 15th, 2022

पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. २९ जुलै रोजी झालेल्या सामन्यात सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ट २१-१५, २१-१३ असा पराभव केला.

सिंधूने १६व्या फेरीत शानदार खेळ केला. हा तिचा सलग तिसरा विजय ठरला आहे. मियाने सिंधूला चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक निश्चित करण्यासाठी सिंधूला आता फक्त एक विजय हवा आहे. सिंधू अंतिम ८ मध्ये दाखल झाली आहे.
अवघ्या ४० मिनिटांच्या सामन्यांत २१-१५, २१-१३ अशा फरकारने सिंधूने सामना जिंकलाय. या विजयामुळे सिंधू केवळ पदकापासून दोनंच पाऊलं लांब आहे. मिया ब्लिकफेल्ड आणि सिंधू यांच्यामध्ये आतापर्यंत सहा सामने झाले असून त्यापैकी पाच सामने सिंधून जिंकले आहेत.

सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली होती. त्यानंतर बुधवार च्या दुसऱ्या सामन्यात तिने विजय मिळवला होता. तर गुरुवारी सिंधूची घौडदौड सुरुच असून तिने आता थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सिंधूचा हा टोकियो ऑलिम्पिकमधील सलग तिसरा विजय आहे.

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमधील आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत आणखी एका विजयाची नोंद केली. पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमधील महिला एकेरीमध्ये सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील सिंधूचं दमदार प्रदर्शन पाहायला मिळत असून भारताची पदकाची आशा पल्लवीत झाली आहे. तिसऱ्या फेरीत सिंधूने डेन्मार्कच्या मिआ ब्लशफेल्ड हिचा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली आहे.

जागतिक क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर असणाऱ्या मिआ ब्लशफेल्ड हिचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. या विजयासह सिंधूने सुवर्णपदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.