Wed. Dec 8th, 2021

पी.व्ही. सिंधूचा अंतिम १६ व्या फेरीत प्रवेश

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला अजून एकच पदक पटकावता आलं आहे. तर आता भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूकडून पदक मिळवण्याच्या भारतीयांच्या आशा वाढल्या आहेत. बुधवारच्या सामन्यामध्ये पी.व्ही सिंधूने पुन्हा एकदा विजयाची नोंद केली आहे. सिंधूने हाँगकाँगच्या चेंयुग गँन यी हिचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला आहे.

सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली होती. त्यानंतर बुधवारी दुसऱ्या सामन्यात देखील विजय मिळवत तिच्या उत्तम कामगिरीत सातत्य राखलं आहे. सिंधूचा हा टोकियो ऑलिम्पिकमधील सलग दुसरा विजय आहे. या विजयामुळे सिंधूने नॉकआऊट फेरीमध्ये प्रवेश केला आहे.
पी. व्ही. सिंधूनं टोकियो ऑलिम्पिकची सुरुवातच विजयानं केली होती. त्यानंतर तिचा दुसरा सामना हाँगकाँगच्या च्युंग एनगान सोबत होता. या सामन्यात सिंधूनं तिचा सहज पराभव केला. सिंधूनं दोन सेटमध्येच च्युंग एनगानचा पराभव केला.

सिंधू सामन्याच्या सुरुवातीपासूनच हाँगकाँगच्या च्युंग एनगानवर दबाव बनवून खेळत होती. सिंधू या सामन्यात काहीशी आक्रमक खेळी करताना दिसून आली. पहिल्या सेटमध्ये सिंधूनं हाँगकाँगच्या च्युंग एनगानचा २१-९अशा फरकानं पराभव केला. खरंतर सिंधूनं पहिल्या सेटमध्येच सामना आपल्या खिशात घातला होता. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही पीव्ही सिंधूनं २१-१६ अशा फरकानं हाँगकाँगच्या च्युंग एनगानचा पराभव केला. या विजयासोबतच सिंधूनं आपलं आणखी एक पाऊल पदकाच्या दिशेनं पुढं टाकलं आहे. देशाला सिंधूकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *