Mon. Sep 20th, 2021

राज्यातील पहिला टोल नाका होणार टोलमुक्त

जय महाराष्ट्र न्यूज, भिवंडी

 

राज्यातील पहिला टोल नाका अशी ओळख असलेला भिवंडी बायपासवरील खारेगाव नाका लवकरच बंद होणार आहे. या टोलचे कंत्राट अखेर संपले असून 20 दिवसानंतर हा नाका टोलमुक्त होणार आहे.

 

 

15 वर्षांच्या कार्यकाळात या टोलनाक्याने सुमारे 490 ते 510 कोटी रुपयांची वसुली केली आहे. तर, हा रस्ता उभारणी आणि 15 वर्षांतील मेंटनन्सचा खर्च 180 कोटी 83 लाख रुपये होता.

 

 

सर्वाधिक टोलनाक्यांचा जिल्हा अशी ठाण्याची ओळख असून या जिल्ह्यात जवळपास 18 टोलनाके आहेत. त्यातला पहिला टोल नाका हा मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या भिवंडी बायपास रोडवरील खारेगाव येथे उभारण्यात आला होता.

 

 

केवळ ठाणे जिल्ह्यातलाच नव्हे तर राज्यातला हा पहिला टोल नाका होता. आयआरबी या कंपनीने या रस्त्याची बांधणी केली होती. त्या मोबदल्यात त्यांना रस्त्यावर टोलवसुलीची परवानगी देण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *