Tue. Mar 31st, 2020

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर टोल दरवाढ

मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. आता मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करणं महागणार आहे. मुंबई-पुणे महामार्गवर टोलमध्ये दरवाढ करण्यात येणार आहे.

त्यामुळे आता वाहनचालकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

१ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

राज्य सरकारच्या अधिसुचनेनुसार या मार्गावर ही दरवाढ केली जाणार आहे.

अशी असेल दरवाढ

सध्या कारसाठी २३० रुपये मोजावे लागतात. परंतु १ एप्रिलपासून २७० रुपये मोजावे लागणार आहेत.

त्यामुळे १ एप्रिलपासून कारचालकांना अधिकचे ४० रुपये मोजावे लागणार आहेत.

मिनी बससाठी आता ३३५ रुपये टोल आहे. तर १ एप्रिलपासून ४२० रुपये द्यावे लागणार आहे. मिनी बसचालकांना यामुळे ८५ रुपये जादा द्यावे लागणार आहेत.

गाडीचा प्रकार सध्याचा दर वाढलेला दर

मोठी बस ६७५ ७९७
मोठा ट्रक ११६५ १३८० ते १८३५
ट्रक ४९३ ५८०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *