Sun. Apr 5th, 2020

आता बँकेत टोमॅटोवर फिक्स डीपॉझिट करता येणार आणि कर्जही मिळणार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

देशात  गेल्या काही दिवसापासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या दराचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.

 

इतकंच नाही, तर टॉमेटो विकत घेणं परवडत नसल्याने अनेकांनी आहारातूनही टोमॅटो वगळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बाजारात टोमॅटोची आवक घटल्याने तसेच

वाढलेल्या टोमॅटोच्या दरांमुळे अनेक ठिकाणी टोमॅटोचे ट्रक चोरीला गेल्याच्याही घटना घडल्या आहेत.

 

टोमॅटोच्या वाढलेल्या या किंमतीचा काँग्रेस पक्षाकडून निषेध केला जात आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवरून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत लखनऊ

काँग्रेसने शहरात ‘स्टेट बँक ऑफ टोमॅटो’ ही बँक सुरू केली. 

 

एखाद्या बँकेमध्ये जशा सुविधा मिळतात तशाच सुविधा या बँकेतही ग्राहकांना मिळणार आहे.  फक्त या बँकेत कोणतीही गोष्ट टोमॅटोशी निगडीत असावी लागणार आहे.

 

या बँकेत ग्राहकांना टोमॅटोवर फिक्स डीपॉझिट करता येणार आहे. तसेच लॉकर आणि कर्जसुद्धा टोमॅटोवर मिळणार आहेत. काँग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या या बँकेला

नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *