Fri. Jun 18th, 2021

जगातल्या Top 10 खाद्यपदार्थांच्या यादीत ‘मसाला डोसा’!

खाऊ गल्लीमध्ये जाऊन आवडत्या पदार्थाच्या गाडीसमोर थांबून आवडत्या पदार्थावर ताव मारायला कोणाला आवडत नाही. खाऊ गल्लीतून जाता जाता नाकामध्ये पावभाजी, पिझ्झा, फ्रॅंकी, चाट, न्युडल्स् अशा नानाविध पदार्थांचे गंध दरवळत असतात. या पदार्थांमध्ये एका दाक्षिणात्य पदार्थाला मात्र खास demand  असते. भारतीय खवय्यांच्या पानामध्ये खास पसंतीला साऊथच्या एका पदार्थाने विशेष जागा मिळवली आहे. तो पदार्थ म्हणजे ‘मसाला डोसा’. आता या पदार्थाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा बहुमान मिळाला आहे.

टॉप-टेन मध्ये भारतीय मसाला डोसा 

जगातील ‘टॉप-टेन’ पदार्थांमध्ये भारतीय मसाला डोश्याचे नाव आले आहे.

‘Huffington Post’ या वृत्तपत्राच्या ट्रॅव्हल्स ब्लॉगवर ‘मसाला डोसा’ ‘Top 10’ डिशेसमध्ये झळकत आहे.

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल आहे.

मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर मोंगलाई डिशेस, पंजाबी cuisines , बिर्याणी अशा खास करून non-veg पदार्थांना जास्त ओळख मिळाली.

त्यामुळे दक्षिण भारतात रोजच्या जेवणात आढळणारे इडली, मेंदू वडा, डोसा, उत्तप्पा यांसारख्या चविष्ट मात्र तुलनेने कमी मसालेदार असणाऱ्या शाकाहारी पदार्थांवर काहीसा अन्यायच होत होता.

तरीही जगात अनेक ठिकाणी भारतीय लोकांना सहज उपलब्ध होणारा आणि खिशाला परवडणारा शाकाहारी पदार्थ म्हणजे डोसाच आहे.

या डोश्यांचेही अनेक प्रकार आता लोकप्रिय होऊ लागले आहेत.

मसाला डोसा हा देखील त्यातलाच एक लोकप्रिय प्रकार.

मसाला डोसा हा आहारातील पोटभरीचा, चविष्ट, काही मिनिटांत तयार होणारा आणि तरीही किफायतशीर असणारा पदार्थ आहे.

त्यामुळे आता ‘Huffington Post’ ने मरणापूर्वी या जन्मात आवर्जून खायलाच हवे, अशा जगातल्या टॉप 10 पदार्थांमध्ये मसाला डोसा हा पदार्थ समाविष्ट केल्यामुळे या पदार्थाचा यथोचित सन्मान झालाय, असंच म्हणावं लागेल. एखाद्या ठिकाणची संस्कृती जाणून घेण्यासाठी तेथील खाद्यसंस्कृतीद्वारे ती समजून घ्या, असं ‘Huffington Post’ च्या या लेखात म्हटलं आहे. त्यामुळे मसाला डोसा आता जगभरातल्या लोकांचं आपल्याकडे लक्ष वेधून घेणार, यात शंकाच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *