Saturday, February 08, 2025 07:01:48 PM
केंद्रात भाजापाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसरी टर्म मिळवली. देशात बहुमताच्या जोरावर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाने आता बहुतांश राज्यात कमळ फुलवण्यास सुरूवात केली आहे.
Apeksha Bhandare
2025-02-08 18:46:37
केंद्राची सत्ता तब्बल तीन वेळा मिळवणारा भारतीय जनता पक्ष दिल्लीची सत्ता मिळवण्यात अपयशी ठरत होता. मात्र, आता विधानसेभेत मिळालेल्या यशानंतर भाजपाचा 27 वर्षांचा वनवास दूर झाला आहे.
2025-02-08 18:07:51
दिल्लीतील विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावर पोस्ट केली आहे.
2025-02-08 17:07:04
भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी आता 21 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सत्ता गाजवणार आहे. आता दिल्लीसह 15 राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे.
Jai Maharashtra News
2025-02-08 16:46:28
दिल्लीच्या शिरपेचात भाजपाने स्वत:चा झेंडा रोवला आहे.
2025-02-08 16:28:50
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्वत: झेंडा फडकवला आहे.
2025-02-08 16:11:24
सुरक्षा परिस्थिती आणि सरकारी नोंदी लक्षात घेता दिल्ली सचिवालय तात्पुरते बंद करण्यात आले आहे. दिल्ली सचिवालयातून कोणत्याही फायली, कागदपत्रे किंवा संगणक हार्डवेअर घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
2025-02-08 15:51:45
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या दारूण पराभवानंतर अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. अण्णा हजारेंच्या या टीकेवर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
2025-02-08 15:13:43
Rohit Pawar : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी इंडिया आघाडीतील पक्ष आणि नेते पारंपरिक पद्धतीने निवडणूक लढवत असल्याबद्दल खंत व्यक्त केली.
2025-02-08 14:26:46
दिल्लीतील आपच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांचा विजय झाला आहे.
2025-02-08 13:58:11
भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'जनशक्ती सर्वोच्च आहे!' विकास जिंकला, सुशासन जिंकले!
2025-02-08 13:35:40
Delhi Election Result 2025: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपला मोठी आघाडी मिळाल्यानंतर, पक्षाच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी दिल्लीत भाजप सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला.
2025-02-08 13:16:36
दिल्लीत भाजपाचं कमळ फुलताना पाहायला मिळत आहे.
2025-02-08 13:14:08
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी पराभव केला आहे.
, Jai Maharashtra News
2025-02-08 13:05:23
भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी आग्नेय दिल्लीतील जंगपुरा येथे झालेल्या चुरशीच्या लढाईत आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा दारुण पराभव केला.
2025-02-08 12:57:30
Delhi Election Result: निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, दिल्ली निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे.
2025-02-08 12:14:28
दिल्ली सरकारमधील तीन मोठे नेते निवडणूक लढवत आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र कुमार जैन यांची नावे आहेत.
2025-02-08 11:14:43
दिल्ली निवडणुकीत जर काँग्रेस आणि आप एकत्रित लढले असते. तर पहिल्या तासभरातच भाजपचा पराभव झाला असता, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
2025-02-08 10:15:57
विमानाचे अवशेष अलास्कातील समुद्रातील बर्फावर सापडले आहेत. बेपत्ता विमान समुद्रातील बर्फावर कोसळले. या दुर्घटनेत विमानात बसलेल्या सर्व 10 प्रवाशांचा मृत्यू झाला.
2025-02-08 10:02:29
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यात सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपची सरशी दिसून येत आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यास, या पाच नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येऊ शकतात.
2025-02-08 09:55:38
दिन
घन्टा
मिनेट