Sunday, April 20, 2025 05:24:08 AM
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, त्यांचा पक्ष महाराष्ट्रात हिंदी सक्तीची होऊ देणार नाही. आम्ही महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादू देणार नाही.
Jai Maharashtra News
2025-04-19 20:26:36
या एआय शिक्षकाचे नाव 'ईसीओ' आहे. हा एक मानवीय एआय रोबोट आहे जो विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकतो, त्यांना शिकवू शकतो आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील देऊ शकतो.
2025-04-19 19:30:21
ब्राह्मण समाजाविरुद्ध आक्षेपार्ह आणि अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल अनुराग कश्यप यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2025-04-19 19:17:33
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात ही बातमी खोटी, दिशाभूल करणारी आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.
2025-04-19 18:53:20
ग्रीन सोल्यूशन्सने 55 कर्मचाऱ्यांना मालवण सहलीसाठी विमान प्रवासासह नेले. या उपक्रमातून टीम एकात्मता, प्रेरणा आणि कर्मचारी कल्याणाचा आदर्श समाजासमोर मांडला गेला.
2025-04-19 18:06:27
महाराष्ट्रातील 800 हून अधिक शाळांना बोगस असल्याचं समोर आलं. यापैकी 100 शाळा आधीच कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत.
2025-04-19 17:42:22
युएई लवकरच दुबई आणि मुंबई दरम्यान पाण्याखालील ट्रेन सुरू करणार आहे, ज्यामुळे दोन्ही शहरांमधील अंतर कमी होईल.
2025-04-19 17:24:27
पश्चिम बंगालमधील कथित हिंदू अत्याचाराविरोधात वर्ध्यात सकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चात हजारोंचा सहभाग; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी प्रशासनाकडे.
2025-04-19 17:01:03
अहवालानुसार, ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळात 327 अमेरिकन विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले. त्यापैकी 50 टक्के विद्यार्थी भारतीय होते.
2025-04-19 16:58:36
लवकरच ईपीएफओ एक नवीन डिजिटल प्रणाली - ईपीएफओ 3.0 लाँच करणार आहे, ज्यामुळे पीएफमधून पैसे काढणे, डेटा अपडेट करणे आणि क्लेम सेटलमेंट करणे पूर्वीपेक्षा सोपे आणि जलद होईल.
2025-04-19 16:40:26
राज-उद्धव संभाव्य युतीवर नवनीत राणांनी टोला लगावत हिंदुत्वाची लढाई सुरूच राहील असं म्हटलं. तसेच मराठी भाषेबाबत ठाम भूमिका मांडून ठाकरे गटावर अप्रत्यक्ष टीका केली.
2025-04-19 16:24:50
जोसेफिन-पॅसिफिक लोकुमु या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य डीआरसीमधील काँगो नदीवर एका लाकडी बोटीत शेकडो प्रवासी होते. त्यादरम्यान बोटीला आग लागली.
2025-04-19 16:23:09
2016 आणि 2019 नंतर पंतप्रधान मोदींचा सौदी अरेबियाचा हा तिसरा दौरा असेल. 2023 मध्ये, सौदी अरेबियाचे युवराज नवी दिल्लीच्या राजकीय भेटीवर आले होते.
2025-04-19 16:17:29
चैत्र महिन्यात रेणावीतील रेवणसिद्ध महाराजांच्या मंदिरात हजारो भाविक पारंपरिक प्रदक्षिणेसाठी येतात. नवसपूर्ती व मन:शांतीसाठी ही श्रद्धापूर्ण परंपरा जपली जाते.
2025-04-19 15:47:28
अमळनेरमध्ये जेसीबीच्या निष्काळजी खोदकामामुळे मुख्य पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया गेलं, अर्ध्या शहरात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे.
2025-04-19 14:59:42
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याची तयारी दर्शवत, महाराष्ट्राच्या हितासाठी भांडणं विसरायला हवं असं मत व्यक्त केल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
2025-04-19 14:12:22
यवतमाळमध्ये पाणी आणताना १२ वर्षांच्या वेदिकाचा मृत्यू झाला. जलजीवन मिशन असूनही पाण्यासाठी जीव गमवावा लागतो, हे प्रशासनाच्या अपयशाचं उदाहरण असल्याची टीका.
2025-04-19 13:35:13
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही संजय घाटगे यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधी आपली भूमिका कायम ठेवली असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहणार असल्याचे स्पष्ट केले.
2025-04-19 12:53:08
बीडमध्ये मुख्यमंत्री दौऱ्यासाठी हेलिपॅड उभारताना १६ झाडांची कत्तल; पर्यावरणप्रेमी संतप्त, वन विभागाची परवानगी होती का, यावर प्रश्न उपस्थित.
2025-04-19 12:12:39
विलेपार्ले पूर्वमधील एक जुने आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाणारे जैन मंदिर बृहन्मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई अंतर्गत पाडले.
2025-04-19 11:54:12
दिन
घन्टा
मिनेट