Wed. Oct 27th, 2021

नागपुरात आतापर्यंत म्युकरमायकोसिसने 26 रुग्णांचा मृत्यू, 600 जणांना बाधा

नागपूर :  देशात कोरोना हाहाकार सुरू असताना आणखी एक आजारामुळे घाबरून आहे. राज्यात मुक्यरमायकोसिस या आजाराने थैमान घालायला सुरुवात केली आहे. या बुरशीजन्य संसर्गाने आतापर्यत नागपुरात तब्बल २६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. तर एकूण ६०० जणांना या ब्लॅक फंगसचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुक्यरमायकोसिस या संसर्गाची अनेकांना बाधा झाली आहे. मार्चपासून आतापर्यंत तब्बल 600 हून अधिक रुग्णाना म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरे करण्यात यश आले असल्याचा दावा कान-नाक-घसा डॉक्टर विदर्भ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत निखाडे यांनी केला आहे. प्रत्यक्षात मात्र केवळ सरकारी आकडे पाहता 284 जणांना बाधा झाली आहे तर 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *