Wed. Apr 14th, 2021

झारखंडमध्ये आयडी स्फोटात तीन जवान शहीद, दोन जखमी

झारखंडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या ‘आयडी’ च्या स्फोटामध्ये झारखंड जग्वार युनिटचे तीन जवान शहीद झाले, तर अन्य दोन जवान जखमी झाले आहे. सीआरपीएफ आणि झारखंड जग्वार यांचे संयुक्त पथक शोध मोहीम राबविले आहे शिवाय यापूर्वी देखील असे अनेक बॉम्ब झारखंडचे डीजीपी नीरज सिन्हा यांनी ही माहिती दिली आहे. आज(गुरूवार) सकाळी ८.४५ मिनिटांनी झारखंडमधील पश्चिम सिंगभूममधील होया हातू गावच्या वनक्षेत्र भागात प्रेशर आयडीचा स्फोट झाला असून झारखंड जगुआर ऑफ स्टेट पोलिसांचे दोन जवान या स्फोटामध्ये जखमी झाले आहेत. याशिवाय सीआरपीएफची १९७ बटालियनचा देखील एक जवान जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. झारखंड पोलिसांचे म्हणणे आहे की, नक्षलवाद्यांनी आयडी पेरून ठेवले होते. या स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. शिवाय या परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *