Wed. Nov 13th, 2019

पुण्यात इराणच्या पर्यटकांना स्थानिकांकडून मारहाण

पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर माणिकबाग परिसरातील दोन इराणी पर्यटकांना येथील स्थानिक तरुणांनी धक्काबुक्की करत त्यांच्या कारच्या काचा फोडल्या.

पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर माणिकबाग परिसरातील दोन इराणी पर्यटकांना येथील स्थानिक तरुणांनी धक्काबुक्की करत त्यांच्या कारच्या काचा फोडल्या.  ते दोघेही एका किराणा दुकानात खरेदी करण्यासाठी  आले होते. महमद हुसेन आणि महमद अबाद  असं या दोन पर्यटकांची नावे आहेत. शनिवारी रात्री हा प्रकार घडला आहे.

नेमकं प्रकरण काय?

महमद हुसेन आणि महमद अबाद हे दोन तरूण इराण देशातून पर्यटन व्हिसावर भारतात आले होते. माणिकबाग परिसरातील एका किराणा दुकानात खरेदी करण्यासाठी ते गेले होते.

यावेळी खरेदी करत असताना पर्यटकाच्या गाडीचा चालक आणि गाईड यांचं दुकानदारासोबत किरकोळ वाद झाला. यावेळी गाडीतील पर्यटकांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र किराणा दुकानात असणाऱ्या तरुणांनी कारचा पाठलाग करून  पर्यटकांना धक्काबुक्की करीत कारच्या काचा फोडल्या.  हा प्रकार शनिवारी रात्री घडला आहे.

यावेळी टुरिस्ट कंपनीच्या चालक आणि गाईडने वाद झाल्यामुळे तेथून पळ काढला आहे. याप्रकरणी स्थानिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र या प्रकाराने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकाराच्या घटना वारंवार घडल्या आहेत.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *