Thu. Sep 16th, 2021

हिमाचल प्रदेशमध्ये दरड कोसळून नऊ पर्यटकांचा मृत्यू

हिमाचल प्रदेश: हिमाचल प्रदेशातील सांगला परिसरात दरड कोसळून झालेल्या अपघातात ९ पर्यटकांचा मृत्यू झालाय, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
किन्नौर येथे मोठ्या पहाडावर झालेल्या भूस्खलनामुळे पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हल्सवर मोठी दरड कोसळली. या वाहनात राजस्थान, महाराष्ट्र आणि दिल्लीतील पर्यटकांचा समावेश होता.

मृतांमध्ये चार महिला असून या अपघातात राजस्थानच्या एकाच कुटुंबातील तिघांचाही मृत्यू झाला, तर नागपूर जिल्ह्यातील प्रतीक्षा पाटील हिचासुद्धा मृत्यू झाला आहे. दरड कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून डोंगवरावरुन दगडं वेगाने खाली खोऱ्यात कोसळत असल्याचं दिसत आहे. दरड नदीवर असणाऱ्या पुलावर कोसळल्यानंतर पुल नदीत कोसळतानाही व्हिडीओत दिसत आहे.

किन्नोरच्या बटसेरीत ही दुर्घटना घडली आहे. मृत झालेले सर्वजण पर्यटक असून त्यांच्या वाहनांवर दरड कोसळली. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *