Mon. Aug 8th, 2022

राज्यातून देशव्यापी बंदला व्यापाऱ्यांचा पाठिंबा

अन्नधान्य, डाळींवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. हा जीएसटी कर १८ जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. पॅकिंग केलेल्या अनब्रँडेड अन्नधान्य, डाळी आदी पदार्थांवर जीएसटी कर लागूकरण्यात येणार आहे. या जीएसटी करामुळे धान्य आणि डाळी ८ ते १० टक्क्यांनी वाढतील अशी व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया आहे. केंद्र सरकारने नामांकित नसलेल्या जीवनावश्यक वस्तूंवर ५ टक्के जीएसटी कर लावण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी १८ जुलै पासून होणार आहे. त्या निर्णयाविरोधात नवी मुंबईतील एपीएमसी धान्य बाजारपेठेत कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. या बाजारपेठेत दररोज होणारी करोडोंची उलाढाल ठप्प होणार आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार गहू, तांदूळ, कडधान्य, डाळी आणि खाद्यतेलाचा समावेश आहे. ५ टक्के जीएसटी आकाल्यास सामान्य नागरिकांवर त्याचा भार पडणार असून व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका बसणार आहे. नवी मुंबई एपीएमसी धान्य आणि मसाला मार्केट मधून दिवसात जवळपास ६० ते ७० हजार क्विंटल कडधान्य मुंबई आणि उपनगरात विकले जाते. एक दिवसात बंदमुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल शनिवारी थांबली आहे . तर आजच्या बंदने मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागल्याची माहिती ग्रोमाचे सेक्रेटरी भीमजी भानुशाली यांनी दिली आहे.

पुण्यातील बाजारपेठ दिवसभर बंद

अन्नधान्यासह जिवनावश्यक वस्तूवर केंद्र शासनाकडून ५ % जी.एस.टी. लागू होणार असल्याच्या निषेधार्थ पुण्यातील बाजारपेठेतील ६०० भुसार व्यापाऱ्यांचे दुकाने असून हे सर्व दुकाने दिवसभर बंद असणार आहे. शासनाने सुरुवातीला फक्त रजिस्टर ब्रॅन्डमध्ये विक्री होणाऱ्या जिवनावश्यक खाद्य वस्तूंवर जीएसटीची आकारणी केली होती.सर्वसामान्य जनतेवर त्याचा बोजा पडला नव्हता पण या बदलामुळे एकूणच सर्व वस्तू अन्नधान्य व डाळी कडधान्ये, आटा, रवा, मैदा, दुग्धजन्य पदार्थ इ. जिवनावश्यक वस्तूंना जीएसटी लागू होईल. केंद्र सरकार जर निर्णय मागे घेतला नाही, तर या विरोधात अजून तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी व्यापाऱ्यांनी दिला आहे.

मनमाड शहरातील अन्नधान्य आणि किराणा दुकाने बंद

जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे.जीएसटी लावण्याचा निर्णय १८ जुलैपासून लागू होणार असल्याने या निषेधार्थ मनमाड शहरातील व्यापारी आणि किरणा असोसिएशनच्या वतीने आज मनमाड शहरातील अन्नधान्य आणि किरण दुकाने बंद ठेवण्यात आली होती येणाऱ्या काळामध्ये हा निर्णय जर मागे घेण्यात आला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा असोसिएशनच्या वतीने देण्यात आला

जळगावातील व्यापारी असोसिएशन तर्फे कडकडीत बंद

केंद्र सरकारने जीवनाश्यक वस्तू वर पाच टक्के जीएसटी लावला असून या जीएसटी च्या विरोधात आज जळगाव शहरातील दाणाबाजार व्यापारी असोसिएशन तर्फे बंद पाडण्यात आला आहे .या बंदामध्ये जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे जवळपास कोट्यावधीची उलाढाल या बंदमुळे ठप्प झाली आहे. याप्रसंगी हा केंद्र सरकारने लावलेला जीएसटी मागे घेण्यात यावा यासाठी मारुतीरायाची महाआरती करत व्यापाऱ्यांनी जीएसटी कमी होण्यासाठी मारुतीरायाला साकडे घातले आहे आम्हाला हा जीएसटी मान्य नाही अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे

देशव्यापी बंदला सांगली व्यापाऱ्यांचा पाठिंबा

पॅकबंद शेतमाल व धान्यावर पाच टक्के जीएसटीच्या प्रस्तावाविरोधात व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला सांगली जिल्ह्यात देखील मोठा प्रतिसाद मिळाला. सांगली मार्केट यार्ड सह जिल्ह्यातील सर्व मार्केट यार्ड बंद ठेवण्यात आलेत. या बंदमुळे जिल्ह्यात कोट्यवधीचे व्यवहार ठप्प झालेत

अन्नधान्ये, डाळी तसेच दुग्धजन्य पदार्थ (दही, ताक, पनीर), पापड, कुरमुरे, गूळ इत्यादी वस्तूंवरही जीएसटी परिषदेने ५ टक्के जीएसटी प्रस्तावित केला आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंना जीएसटी कक्षेबाहेर ठेवले जाईल, असे आश्वासन सरकारने २०१७मध्ये दिले होते. परंतु आता या कराचा प्रस्ताव तयार करून हे आश्वासन सरकारने मोडले आहे. त्यामुळे देशभरातील व्यापाऱ्यांबरोबरच सामान्य ग्राहकांमध्येही असंतोष निर्माण झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.