Mon. Jan 17th, 2022

कल्याण डोंबिवलीचे नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त, याला जबाबदार KDMC की रेल्वे?

कल्याण डोंबिवलीत दोन पुलांमुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीने नागरिक बेहाल झाले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना याचा फटका बसू नये यासाठी KDMC नगरसेवकांनी चक्क रेल्वेवर खापर फोडत महासभा तहकूब केली. दोन मंत्री, दोन खासदार, चार आमदार आणि सत्तेत असून सुध्दा दोन पुलांचे काम होत नाही तर सत्तेत आहात कशाला असा सवाल कल्याण डोंबिवलीकर विचारत आहेत.

डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर आरओबी 28 तारखेपासून दुरुस्तीसाठी बंद होणार आहे.

याचा फटका लाखो डोंबिवलीकरांना बसणार आहे.

कारण हा पूल बंद झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे.

या आधी कल्याण डोंबिवलीला जोडणारा पत्री पूलाचे काम अद्याप रखडले आहे.

ऐतिहासिक पत्रीपूल पडल्यानंतर आठ महिन्यात नवीन पूल उभारण्याच आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलं होतं.

मात्र अजून नवीन पुलाचे कामच सुरु झालं नाही.

एका पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरु असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

मंगळवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची महासभा होती. यामध्ये जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, भाजप नगरसेवक राहुल दामले यांनी हा मुद्दा धरून ठेवला.

चर्चेदरम्यान रेल्वेवर खापर फोडलं गेलं.

कोपर ब्रिज तसंच पत्रीपूल हा फक्त रेल्वेमुळे रखडला असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला.

एवढंच नाही तर KDMC स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. मात्र या वक्तव्यामुळे सेना भाजपचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मनसेनेही सत्ताधारी अपयशी ठरले असल्याचा असा टोला लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *