Thu. Sep 16th, 2021

ठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे : मुंब्रा बायपास येथील ब्रिजला पडलेला भगदाड मुळे मुंब्रा बायपास बंद केला आहे आणि त्याचाच परिणाम ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येत आहे. ठाणे शहरात आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात ट्राफिक झाले आहे. मुंब्रा बायपास बंद असल्या कारणामुळे संपूर्णपणे ट्राफिक ही नाशिक मार्गे भिवंडी बायपास येथून वळवण्यात आलेली आहे. मुंबईच्या दिशेने येणारा इस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून संपूर्णपणे ट्राफिक जाम हा नाशिक मार्ग पर्यंत आहे.

यामुळेच ठाणे शहरामध्ये देखील अंतर्गत रस्त्यांवर ती मोठ्या प्रमाणात ट्राफिक पाहायला मिळत आहे. नाशिक हायवे रोडवर वरील असणारा साकेत ब्रिज निमुळता असल्याकारणामुळे ट्राफिक वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. आज सकाळपासूनच ठाणेकरांना या ट्रॅफिकच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मुंब्रा बायपासच्या रोडचे काम जलद गतीने झाले नाही तर आणखी काही दिवस ठाणेकरांना अशा ट्रॅफिकला सामोरे जावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *