Jaimaharashtra news

रोडरोमियोंवर कारवाई, 16 हजारांचा दंड वसूल

वाहतूक पोलिसांनी रोडरोमियोंवर कारवाई करत १६ हजारांचा दंड वसूल केला आहे. हिंगोली वाहतूक शाखेने ही कारवाई केली आहे.

हिंगोली वाहतूक शाखेच्या वतीने रोडरोमियोंविरोधात ही मोहिम हाती घेतली होती.

रोडरोमियोंचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारींची दखल घेत वाहतूक पोलिसांनी ही मोहिम हाती घेतली.

शाळा, कॉलेज आणि क्लासेसच्या ठिकाणी रोडरोमियो बाइकवर येऊन थांबतात.

रोडरोमियो चिडीमारी करतात, मुलीच्या मागे मागे जातात, गाड्यांच्या रेसिंग लावतात, अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

यानंतर पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानंतर वाहतूक पोलिसांनी शाळा कॉलेजेस या ठिकाणी जाऊन रोडरोमिओं विरोधात मोहीम सुरू केली.

माणिक स्मारक शाळा आदर्श विद्यालय या ठिकाणी रोडरोमियोंवर कारवाई केली गेली.

या कारवाईत वाहतूक पोलिसांनी विनानंबर असलेल्या बाईक, फॅन्सी नंबर प्लेट, या आणि अशा बाईकस्वार रोडरोमियोंवर कारवाई केली. पोलिसांनी एकूण ६० रोडरोमियोंवर कारवाई केली.

तसेच एकूण २५ वाहने जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण १६ हजारांचा दंड वसूल केला.

वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांकडून वाहने जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्या पालकांना बोलवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

Exit mobile version