Sun. May 16th, 2021

ट्राय करा TRAIचे ‘हे’ नवीन अॅप

DTH वापरकर्त्यांसाठी टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नवीन नियमांमुळे अनेकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. कोणत्या चॅनलसाठी कोणते प्लान घ्यायचे? असे सवाल नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत.
ग्राहकांच्या या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी TRAIने नवीन अॅप तयार केला आहे.

 

जाणून घ्या या अॅपचे वैशिष्ट्य

  • ‘चॅनेल सिलेक्टर’ असे या अॅपचे नाव आहे.
  • आपल्या आवडीचे चॅनेल निवडता येतील.
  • चॅनेलचे दर या मार्फत पाहू शकता.
  • निवडलेले चॅनेल पाहण्यासाठी सर्व्हिस प्रोवाइडरशी संपर्क साधावा लागणार आहे.
  • महिन्याकाठी किती पैसे द्यावे लागतील याची माहिती हा अॅप देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *