Sat. Nov 27th, 2021

चॅनल निवडण्यासाठी ट्रायची 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

Human hand with remote zapping TV channel.

आता प्रेक्षकांना आवडीचे टीव्ही चॅनल निवडण्यासाठी ट्रायने 31 मार्चपर्यंत मुदतवाढ केली आहे. यामुळे प्रेक्षकांना दीड महिन्यांचा जास्त काळ मिळाला आहे. ट्रायने यापूर्वी 31 जानेवारीपर्यंतचा कालावधी दिला होता. मात्र ट्रायच्या नव्या नियमांनुसार प्रेक्षकांनी टीव्ही चॅनल पॅक निवडले नसल्यामुळे आणि प्रेक्षकांना पॅक निवडता येत नसल्यामुळे ही कालावधी 31 मार्चपर्यंत केल्याचे समोर आले आहे. ट्रायच्या आदेशानुसार दर महिना 153 रुपये देऊन 100 चॅनल्स पाहू शकतात.

153 रुपयात किती चॅनल्स उपलब्ध होणार ?

153 रुपयात 100 चॅनेल्सच्या स्लाॅटसाठी नेटवर्क कपॅसिटी फी द्यावी लागेल.

यात जर प्रेक्षकांनी  फ्री टू एअर चॅनेल निवडलेत तर अतिरिक्त चार्ज भरावा लागणार नाही.

पेड चॅनेलसाठी प्रेक्षकांना त्या बुकेप्रमाणे पैसे भरावे लागतील.

जर 100हून जास्त चॅनल पाहायचे असतील तर – 25 चॅनल्ससाठी 20 रुपये.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *