Mon. May 23rd, 2022

‘बंटी और बबली २’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

  बॉलीवूडमध्ये सध्या चित्रपटाचे सिक्वेल प्रदर्शित करणे हा नवा ट्रेंड सुरू आहे. २००५मध्ये प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन, रानी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांच्या चित्रपटाचा सिक्वेल ‘बंटी और बबली २’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री रानी मुखर्जी मुख्य भुमिकेत झळकले आहेत.

  ‘बंटी और बबली २’ चित्रपटाचा हा ट्रेलर ३ मिनिट ११ सेकंदाचा आहे. यशराज फिल्मसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात कलाकारांच्या दोन जोड्या झळकणार असून एक जोडी म्हणजे सैफ अली खान आणि रानी मुखर्जी तर दुसरी जोडी म्हणजे सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी ही आहे. चित्रपटात बंटी, बबली यांच्या नावाने सिद्धांत आणि शर्वरी हे पात्र अनेकांना लुटतात. त्यानंतर तेथील पोलिसांना पुन्हा एकदा ते बंटी आणि बबली सक्रीय झाल्याचे वाटते. अशाप्रकारे चित्रपटात पात्रांची खरी मजा झळकणार आहे.

  दिग्दर्शक वरुण ‘शर्माने बंटी और बबली २’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे करण्यात आली होती. हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाने सर्व प्रेक्षकांना चांगलेच हसवले. आता चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.