Tue. Jun 28th, 2022

अहान शेट्टीचा डेब्यू चित्रपट ‘तडप’चा ट्रेलर प्रदर्शित

  बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अहानच्या पहिल्या ‘तडप’ या डेब्यू चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मिलन लुथरिया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केल असून अभिनेता अहान शेट्टी आणि अभिनेत्री तारा सुतारिया मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

 अहान आणि ताराची जबरदस्त केमिस्ट्री, रोमान्स आणि ऍक्शन ‘तडप’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये झळकत आहे. २ मिनिट ४८ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अहान आणि ताराची रोमॅन्टिक लव्हस्टोरी झळकली आहे. अहान आणि तारा यांची दमदार एन्ट्री, डॅशिंग लूक सोशल मिडीयावर चांगलाच गाजत आहे. चित्रपटात अहान शेट्टीने ईशान नावाचे पात्र साकारले आहे तर, तारा सुतारियाने रमिशा नामक मुलीची भूमिका साकारली आहे. ईशान आणि रमिशा यांच्या लव्हस्टोरीमध्ये एक वळण येते. आणि आता हे वळण नेमकं कुठे जाऊन थांबत यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.

 ‘तडप’ हा चित्रपट ‘आरएक्स १००’ या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. येत्या ३ डिसेंबर २०२१ रोजी तडप चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात अभिनेता अहान शेट्टी आणि अभिनेत्री तारा सुतारिया मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून ट्रेलरला चांगलीच पसंती मिळत आहे. त्यामुळे आता अहानचा डेब्यू चित्रपट पडद्यावर काय कमाल करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.