बहिणीला शाप दिल्याने तृतीयपंथीयाची हत्या

कल्याण पूर्व,खडगोळीवलीत मध्ये दोन दिवसांपूर्वी  एका तृतीयपंथीची  तीक्ष्ण हत्याराने हत्या झाली होती.  बंद घरात  शेजाऱ्यांना मृतदेहाची दुर्गंधी आल्यामुळे हत्येचे प्रकरण उघड झाले आहे. आरोपीने आपल्या बहिणीला या रेखा देसाई तृतीयपंथींनी शाप दिल्यामुळे ती मरण पावली याचा राग मनात ठेवून या तृतीयपंथीची त्याने हत्या केल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सूर्या स्कूल बस डेपोच्या मागे एका रूममध्ये धीरज  साळवे ,उर्फ रेखा देसाई राहत होती.

दोन दिवसांपुर्वी  घरात  शेजाऱ्यांना रेखा देसाईचा मृतदेह आढळून आला होता.

सुशील भालेराव हा रेखाचा प्रियकर देखील घरात येत असल्याने त्याच्यावर पोलीसांचा संशय होता.

परंतु  काही तासातच पोलीसांनी आरोपीला मुंब्र्यातून अटक केली आहे.

आपल्या बहिणीला तृतीयपंथी रेखा देसाईने शाप दिल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

आणि याचाच राग मनात धरून त्याने तृतीयपंथीयाची हत्या केली आहे.

तीक्ष्ण हत्याराने हत्या  रेखा देसाईची हत्या करण्यात आली होती.

कोलसेवाड़ी पोलिसांनी काही तासातच आरोपीला गजाआड केले  आहे.

 

 

 

Exit mobile version