Mon. Aug 15th, 2022

काल बदली आज स्थगिती

महाराष्ट्र पोलीस दलातील काल फेरबदल करण्यात आली. पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले. मात्र बदलीचे आदेश काही तासातच थांबवण्यात आले आहेत. पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या चोवीस तासात स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गृहखात्याचा अजब कारभार समोर आला आहे.

महाराष्ट्र पोलीस दलात काल काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, अवघ्या काही तासातच पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या चोवीस तासात स्थगित करण्यात आल्या आहेत.

‘या’ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

राजेंद्र माने, महेश पाटील, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे या पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या काल करण्यात आल्या होत्या. मात्र, आज काही तासातच त्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे.

स्थगित केलेल्या अधिकाऱ्यांची कुठे होती बदली?

राजेंद्र माने यांना ठाण्यातील पूर्व प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. महेश पाटील यांना मुंबईतील वाहतूक विभागात अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. संजय जाधव यांना ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली  होती. पंजाबराव उगले यांना मुंबईच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. आणि दत्तात्रय शिंदे यांना मुंबई संरक्षण आणि सुरक्षा विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती.

काय आहेत नव्या जबाबदाऱ्या

कृष्ण प्रकाश : विशेष पोलीस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा


दीपक पांडे : महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग


अंकुश शिंदे : पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड


जयंत नाईकनवरे : पोलीस आयुक्त , नाशिक


संदीप कर्णिक : सहपोलीस आयुक्त, पुणे


डॉ.रविंद्र शिसवे : विशेष पोलिस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग


मिलिंद भारंबे : विशेष पोलीस महानिरीक्षक, मुंबई


सुहास वारके : सहपोलीस आयुक्त, गुन्हे


निमित्त गोयल : ग्रामीण पोलीस अधीक्षक, औरंगाबाद


Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.