Jaimaharashtra news

नागपूरमध्ये तृतीयापंथीयांनी बजावले मतदानचे हक्क

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून अनेक दिग्गज नेत्यांसह नागरिकांनी मतदान केले आहे. मात्र यावेळी नागपूरमध्ये तृतीयापंथी नागरिकांनीही मोठ्या संख्येने मतदान केल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत, भय्याजी जोशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नाना पटोले यांनी मतदान केले आहे.

तृतीयापंथीयांनी केले मतदान –

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान महाराष्ट्राच्या 7 मतदारसंघात सुरू आहे.

विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा मतदारसंघात मतदान सुरू आहे.

यावेळी नागपूरमध्ये नागरिकांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे.

दिग्गज नेत्यांसह अनेक नागरिकांनी मतदान केले आहे.

यावेळी तृतीयपंथींनी सुद्धा मोठ्या संख्येत मतदान केले आहे.

सरकार कुठलेही आले तरी तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडविण्याचा आव्हान त्यांनी यावेळी केले आहे.

 

 

Exit mobile version