Sun. Sep 19th, 2021

नागपुरमध्ये तृतीयपंथींच्या दोन गटात तुफान हाणामारी

नागपूरमध्ये तृतीयपंथीच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

तृतीय पंथीयांच्या दोन गटात टोलनाक्याजवळ तुंबळ हाणामारी झाली. हि हाणामारी बिदागीच्या जागेच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे.

दोन गटात वाद बिदागी मागण्याच्या जागेवरून नागपूर-अमरावती महामार्गावरील टोल नाक्याजवळ झाला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर वाडी पोलीस स्टेशन समोर पुन्हा दोन्ही गट समोरासमोर आले. तिथेही यांच्यात हाणामारी सुरू झाली.

वाडी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी थांबवण्याचे प्रयत्न केले असता काही तृतीय पंथीयांनी आपले कपडे काढले. त्यामुळे पोलिसांना त्यांना रोखण्यास अडचण निर्माण झाली.

टोलनाक्या जवळ झालेल्या हाणामारी प्रकरणी तृत्तीय पंथ्याच्या दोन्ही गटावर कळमेश्वर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जयश्री संगीता गुरू शर्मा आणि दामिनी भुरी, साक्षी शहा ह्या दोन्ही गटातील व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *