Sun. Aug 18th, 2019

पुण्यात तृतीयपंथीयाची हत्या

14Shares

पुण्यातील महंमदवाडी येथे एका इमारतीमध्ये राहणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अरबाज शेख (वय-20) असं त्या हत्या झालेल्या तृतीयपंथी व्यक्तीचं नाव आहे.दरम्यान हत्येचं नेमकं कारण समजू शकले नाही.

नेमक काय घडलं ?

पुण्यात महंमदवाडी येथील सदाशिवनगर परिसरात पिंपळे इमारतीमध्ये अरबाज शेख राहत होता.

सदनिकेत तो एकटाच रहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

त्यानं अनेक कार्यक्रमांमध्ये नृत्यही केलं आहे.सोमवारी सकाळी राहत्या घरी अरबाजचा मृतदेह आढळला.

वानवडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.

गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयता पाठवण्यात आला असून पोलिस अधिक तपास  करत आहेत.

14Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *