पाच महिन्यांनंतर महाड भोर जोडणारा वरंध घाटातील रस्ता होणार सुरू

दक्षिण रायगडमधून भोरघाट मार्गे पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल पाच महिन्यांनंतर महाड भोर जोडणारा वरंध घाटातील (Varandha Ghat) रस्ता आता वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीदरम्यान वरंध घाटातील एका वळणार हा घाट रस्ता वाहून गेला होता. तर तीन ते चार ठिकाणी घाटरस्त्यावर दरड कोसळल्या होत्या. महाड सार्वजनिक बांधकाम (infrastructure) विभागाने या घाटरस्त्याची डागडूजी पूर्ण केली असून गुरूवारपासून वरंध घाट वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

वरंध घाट म्हणजे दक्षिण रायगडमधून भोर, पुणे, पंढरपूर जोडणारी मुख्य रस्ता आहे.

6 ऑगस्ट रोजी हा घाट रस्ता वाहून गेला होता.

अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या, तर घाट रस्त्याच्या संरक्षण भिंती देखील दूरावस्थ झाल्या होत्या.

सुरक्षेचा विचार करून जिल्हाधिकारी रायगड यांनी या रस्त्यावरील वाहतुक बंद केली होती.

घाट रस्त्याचे काम पूर्ण झाले असुन दोन दिवसांनी म्हणजे गुरूवारपासून वरंध घाट वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

Exit mobile version