Sun. Jun 20th, 2021

पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

गेल्या काही महिन्यांपासून पालघरमध्ये भुकंप होताना दिसत आहे. पालघर जिल्ह्यात डहाणू, तलासरी तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के बसले आहेत. पालघरमध्ये झालेला हा भूकंप सर्वात मोठा तीव्रतेचा असल्याचे समजते आहे. ४.३ रिश्टर स्केल इतकी नोंद करण्यात आली असून सकाळी ११.१५ च्या सुमारास हा धक्का बसला आहे.

आजवरचा सर्वात मोठा भुकंप –

पालघरमध्ये आज पुन्हा भुकंपाचा धक्का बसला आहे.

गेल्या महिन्यात 4.1 चा धक्का बसला होता.

गेल्या 3 महिन्यांपासून पालघरला भूकंपाचे धक्के बसत असून आज बसलेल्या धक्क्याची तीव्रता सर्वात जास्त आहे.

4.3 रिश्टर स्केल इतकी या भूकंपाच्या तीव्रतेची नोंद करण्यात आली आहे.

घरातील काही भिंतींना तडेही पडले आहेत.

पालघर जिल्ह्यासह गुजरातमधील उंबरगाव, सिल्वासा, वापीही या भूकंपाने हादरले आहे.

आज दहावीची परीक्षाही सुरू असून काही ठिकाणी विद्यार्थीही भयभीत झाल्याची माहिती आहे.

मध्यरात्रीपासून  भुकंपाचे 5 ते 6 सौम्य धक्के जाणविले गेले, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *