Sat. Sep 21st, 2019

खासदार हिना गावितांच्या गाडीवर मराठा आंदोलनकर्त्यांचा हल्ला…

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, धुळे

नंदुरबारच्या खासदार हिना गावित यांच्यावर धुळ्यात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज नंदुरबार बंदची हाक देण्यात आली आहे. आदिवासी एकता परिषद अक्कलकुवाच्या वतीने जाहीर निषेध करून अक्कलकुवा तालुकासह संपुर्ण नंदुरबार जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे.

काल धुळ्यात मराठा मोर्चाकडून झालेल्या तोडफोडीच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे.यामुळे पंधरा दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. अचानक घडलेला हा प्रकार निस्तारण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. 

दरम्यान कालच्या घटनेनंतर हिना गावित यांनी तोडफोड करणाऱ्यांविरूद्ध ऍट्रोसिटीची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर 25 कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांची विशेष पथक संशयीतांचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *