Tue. Aug 9th, 2022

उमेश कोल्हे यांना अमरावतीत श्रद्धांजली

उमेश कोल्हे यांची हत्याप्रकरणी अमरावती शहरात आज (सोमवारी)सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. तर दुसरीकडे अमरावतीच्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या अचलपूर परतवाडा येथे देखील स्थानिक भाजपाच्या वतीने जयस्तंभ चौक येथे श्रद्धांजली वाहण्यात आली . २१ जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. हत्येच्या निषेधार्थ सोमवारी भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याच बरोबर उमेश कोल्हे यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील करण्यात आली.

अमरावती येथील राजकमल चौकात ११ वाजता श्रद्धांजली सभा घेण्यात येत आहे. या सभेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. अमरावती येथील ४०० पोलीस अकोला येथील ३०० पोलीस आणि एसआरपीएफच्या ३ कंपन्या पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज करण्यात आलेले आहेत . अमरावती शहरातील चौका चौकात हा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पोलीस उपायुक्त विक्रम साळी हे सकाळपासूनच स्वतः बंदोबस्तासाठी उतरलेले आहे.भाजपाच्या वतीने जयस्तंभ चौक येथे श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. त्यानंतर यावेळी भाजपसह बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय कार्यालयात उमेश कोल्हेची हत्या ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी अशी मागणी केली.

अमरावती शहरातील मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी रात्रीच्या सुमारास हत्या करण्यात आली होती. दरम्यान, उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास आता एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) कडे सोपवण्यात आला होता. याप्रकरणी तपास करण्यासाठी एनआयएकडे पथक अमरावतीमध्ये दाखल झाले होते . तर उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे.

उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ प्रसार माध्यमांवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळेच उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप नेते व खासदार अनिल बोंडे आणि भाजपचे राज्य प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली होती. त्यामुळे आता उमेश कोल्हे यांच्या हत्येमागे वादग्रस्त नुपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? असा सवाल सर्व स्तरावरून उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.