तृणमूलच्या महिलेकडून भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची पिळवणूक

पश्चिम बंगाल: पश्चिम बंगामधील निवडणूकीच्या निकालानंतरदेखील हिंसाचाराच्या घटना समोर आहेत. पश्चिम बंगालमधील बर्दमन शहरातदेखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसची एक महिला पंचायत सदस्य एका भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलेची भर बाजारात पिळवणूक करत असल्याची घटना समोर आली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या पंचायत सदस्य असलेल्या महिलेने दुसऱ्या महिलेला उठाबशा काढायला लावत असून उठाबशा काढणारी महिला आणि तिच्या कुटुंबातील व्यक्ती हे भाजपला पाठिंबा देत आहेत. हा संपूर्ण व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे

Exit mobile version