धक्कादायक: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची हत्या

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
शनिवारी रात्री झालेल्या सत्यजीत बिश्वास यांच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे.
सत्यजीत बिश्वास हे कृशनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.
ते फुलबाडी परिसरात आयोजित सरस्वती पुजेच्या कार्यक्रमासाठी गेले होते.
पुजा सुरू असतानाच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याची माहिती आहे.
त्यांना तात्काळ शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
पण रुग्णालयात पोहचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
सत्यजीत यांच्या हत्येमागे भाजपा ?
- सत्यजीत बिश्वास यांची हत्या भाजपाच्या सांगण्यावरून झाली असल्याचा तृणमूल काँग्रेसचा गंभीर आरोप
- सत्यजीत यांच्या हत्येमागे भाजपचे मुकूल रॉय, तृणमूलचे जिल्हाध्यक्ष गिरीशंकर दत्ता यांचा आरोप
- तृणमूलमधील काही विश्वासघातकी लोकांनी भाजपला मदत केली असल्याचा तृणमूल काँग्रेसने ट्विटवरून आरोप