तृणमूल कॉंग्रेसचे निवडणूक आयोगाला मोदींविरोधात पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या केदारनाथ आणि बद्रीनाथच्या यात्रेवर आहेत. शनिवारी रात्रीपासून ते 17 ते 18 तास गुहेत बसून ध्यानधारणा करत होते. रविवारी सकाळी केदारनाथ मंदिरात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मीडियाशी संवाद साधला. मतदानाचा शेवटचा टप्पा सुरू असताना मीडिया दोन दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केदारनाथ दौरा दाखवत असल्यामुळे तृणमूल कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे मोदींविरोधात तक्रार दाखल केली.

नेमकं प्रकरण काय ?

गेल्या दोन दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ दौऱ्यावर आहे.

पंतप्रधान मोदी 17 ते 18 तास गुहेत बसून ध्यानधारणा करत होते.

शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाही मीडिया दोन दिवासांपासून मोदींचा केदारनाथ दौरा दाखवत असल्याचे तृणमूल कॉंग्रेसने म्हटलं आहे.

तसेच मीडियाशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी केदारनाथच्या विकासाची इच्छा व्यक्त केल्याचेही म्हटलं आहे.

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आचारसंहिता भंग करत असल्याचे तृणमूल कॉंग्रेसने म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाला पत्र लिहून मोदींवर कारवाई करण्याची मागणी तृणमूल कॉंग्रेसने केली आहे.

 

केदारनाथचा विकास करण्याची इच्छा – मोदी

 

Exit mobile version