Tue. Mar 9th, 2021

ठाणे-बोरिवली बसमध्ये 2 जिवंत मगरी!

बोरिवलीला जाणाऱ्या प्रायव्हेट बसमध्ये चक्क 2 जिवंत मगरी आढळून आल्या. या मगरी छोट्या होत्या. या मगरींची या कासगी बसमधून तस्करी केली जात होती. मात्र ठाणे वनक्षेत्रपाल पथकाने तस्करांचा डाव उधळून लावला.

तस्करीसाठी वेगवेगळ्या युक्त्या-प्रयुक्त्या वापरल्या जात असल्याचं दिसून येतंय.

ठाण्यामध्येही अशाच प्रकारचा एक प्रयत्न वनक्षेत्रपाल पथकाने हाणून पाडला.

दोन छोट्या मगरींची तस्करी एका खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधून केली जात होती.

बसच्या डिक्कीमध्ये दोन्ही जिवंत मगरी होत्या.

याची माहिती वनक्षेत्रपात पथकाला मिळाली.

ठाणे वनक्षेत्रपाल पथकाने ठाण्याकडून बोरीवलीकडे जाणाऱ्या एमएच 12 क्युडब्ल्यू 9617 या बसवर अचानक धाड टाकली.

तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला.

वन विभागाच्या पथकाने बस चालक मोहंमद अब्दुल रहीम हाफिज, खुद्दुस लतीफ बैग आणि शिवाजी जी बलाया या तिघांना अटक केली असून पोलिसांच्या चौकशीवर तस्करी करत असल्याचे त्यांनी कबूल केले आहे.

तसेच त्या मगरी कुठून आणल्या याची पुढील चौकशी चालू असल्याची माहिती उपवन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *