Sat. May 25th, 2019

….. त्याने दिला व्हॉट्सअ‍ॅपवरून तिला तिहेरी तलाक

0Shares

 

तिहेरी तलाक विधेयकासबंधी संसदेत इतका गदारोळ सुरू आहे. तर इकडे भिवंडीत एका मुस्लिम महिलेला चक्क व्हॉट्सअ‍ॅपवर तीन तलाक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पतीसह तीघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्यासाठी हा प्रकार करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. या मुस्लिम दाम्पत्याचं 2014 साली लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगा देखील आहे. नदीम शेख असे या पतीचे नाव असून तो टेक्निकल इंजिनीअर म्हणून काम करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

नदीम शेख यांच आरजू यांच्याशी 2014 साली विवाह झाला होता.

पती नदीम शेख टेक्निकल इंजिनीअर आहे तर पीडित महिला ही पायाने अपंग असून घरकाम करते.

18 मे 2014 रोजी नदीम याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता.

त्यावेळी हुंडा म्हणून आरजूच्या आई-वडिलांनी जावई नदीम यास 10,051रु व संसारोपयोगी वस्तू भेट दिली होती.

मात्र लग्नाच्या काही दिवसानंतर लगेचच पीडित महिलेचा छळ करायला सुरुवात केली.

गेले पाच वर्ष नदीम नेहमी चारित्र्यावर संशय घेवून तो नेहमी आरजूला मारझोड करत होता.

मागील महिन्यापासून त्याने 10 लाखांच्या हुंड्यासाठी तगादा लावला आहे.

ही मागणी पूर्ण न केल्याने पीडित महिलेला बेदम मारहाण करून घरातून बाहेर काढलं होतं.

तसेच महिलेला व्हॉट्सअ‍ॅपवर ट्रिपल तलाक दिल्याचं सांगितलं गेलं.

यामुळे धक्कादायक प्रकारामुळे तिने पोलीसात धाव घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *