Mon. Jan 24th, 2022

‘लष्करांनी संशयित समजून गोळीबार केला’; गृहमंत्री अमित शहांचे स्पष्टीकरण

नागालॅंडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नागालँडमधील मोन जिल्ह्यात काल मध्यरात्री झालेल्या गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागालॅंडमध्ये घडलेल्या घटनेबद्दल निवेदन व्यक्त केले आहे.

नागालँडमध्ये लष्कराने संशयित समजून गोळीबार केला असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले आहे. नागालँडमधील निर्दोष नागरिकांच्या मृत्यूनंतर सैन्याकडून दु:ख व्यक्त करण्यात आले असल्याचे अमित शहा यांनी निवेदनात सांगितले.

ते म्हणाले, एनएससीएन-के या संघटनेच्या युंग ओंग गटाचे अतिरेकी या भागात लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर जवानांनी अतिरेक्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. अंधारामधून गाडी ओळखण्यास लष्करांकडन चूक झाली. जवानांनी गाडी थांबवण्यास सांगितले मात्र गाडी थांबवली नाही त्यामुळे जवानांनी संशयित समजून गोळीबार केला असल्याचे निवेदन अमित शहा यांनी दिले.

संशयित समजून जवानांनी केलेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर गावकऱ्यांनी सैनिकांना घेरले असून लष्करांची वाहने जप्त केली. त्यावेळी उसळलेल्य दंगलीत एक जवान शहीद झाला असल्याचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *