Thu. Dec 12th, 2019

कोल्हापूरात ट्रक आणि ट्रॅक्समध्ये भीषण अपघात; 2 वर्षाच्या बाळाचा मृत्यू

कोल्हापूरच्या हातकणंगले येथे ट्रक आणि ट्रॅक्समध्ये भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 9 जण गंभीर जखमी असून यामध्ये 2 वर्षाच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात अपघातग्रस्त कर्नाटकातील सवळगी गावचे रहिवासी आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

नेमकं काय घडलं ?

जोतिबाच्या दर्शनासाठी जात असताना ट्रक आणि ट्रॅक्समध्ये भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरात घडली.

देवदर्शनासाठी कर्नाटकातील रहिवासी येत असताना ही घटना घडली.

या अपघातात 9 जण गंभीर जखमी झाले अलून 2 वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला.

कोल्हापूरच्या हातकणंगले गावाजवळ हा अपघात झाला आहे.

हा अपघात रविवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडला आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *