Fri. Sep 20th, 2019

अबब! आता लुंगीवाल्या ड्रायव्हरला ‘इतक्या’ हजारांचा दंड

मोटार वाहन कायद्याअंतर्गत  काही नवीन नियम वाहन चालकांवर लादण्यात आले आहेत. त्यामध्ये लुंगी नेसून ट्रक  चालवल्यास  2000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

0Shares

मोटार वाहन कायद्याअंतर्गत  काही नवीन नियम वाहन चालकांवर लादण्यात आले आहेत. त्यामध्ये नियमभंग केल्यास भरघोस दंड आकारण्यात आला आहे. यात एक अजब नियम वाहन चालकांवर लादण्यात आला आहे. लुंगी नेसून ट्रक  चालवल्यास  2000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये लुंगी नेसून ट्रक चालवत होता त्यामुळे त्याला  2000 हजार रुपयांचा  दंड भरावा लागला आहे.वाहन चालवाताना “ड्रेस कोड”  घालावा लागणार. हा नियम अनिवार्य आहे. तसेच  चप्पल  किंवा सँडल घालून गाडी चालवत असाल तरी ही दंड भरावा लागणार असल्याचा नियम आहे.

नविन नियमानुसार…..

मागील नियमानुसार फक्त वाहन परवाना, सीट बेल्ट न लावल्यास, हेल्मेट न घातल्यास आणि कागपत्र नसल्यास  दंड भरावा लागत होता पंरतु आता नव्या नियमानुसार वाहन चालकानी  “ड्रेस कोड”  न घातल्यास  सुद्धा  भरावा लागणार आहे.

व्यावसायिक आणि अवजड वाहकाच्या चालकांना  सुद्धा  आता “ड्रेस कोड”  घालावे लागणार तो नसल्यास  त्यांच्यावर कारवाई होणार आहे. नव्या नियमानुसार वाहन चालवताना चप्पल आणि सँडल घातल्यास सुद्धा दंड भरावा लागणार आहे.

या  कायद्यानुसार हे नियम आतापर्यंत कोणीही पाळले नाहीत.  तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.  आता हा नियम न पाळल्यास कठोर कारवाई होणार आहे. पंरतु  या कारवाईची सुरुवात ही उत्तर प्रदेशमध्ये झाली आहे.

याठिकाणी लुंगी घालून ट्रक चालवल्यामुळे 2000 हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. वाहतूक चालकांना आता फूल पॅट, शर्ट किंवा टीशर्ट आणि बूट घालावेच लागणार आहेत. असा ही नियम यामध्ये आहे.

“ड्रेस कोडचा” नियम हा 1939 पासून आहे. पंरतु त्या नियमाचे कायद्यानुसार संशोधन केले 1989 त्यानंतर 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला. मात्र आता नविन नियमानुसार 2000 हजार रुपयांचा दंड घेण्यात येणार आहे. स्कूल बसच्या ड्रायवरला सुद्धा “ड्रेस कोड” वापरणे अनिवार्य आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *