Wed. Oct 27th, 2021

सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

वणीच्या सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतत असताना भाविकांच्या उभ्या असलेल्या गाडीला ट्रकने मागून धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला असून सहा भाविक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

नेमकं काय घडलं ?

वणी येथील कृष्णगावाजवळ आयशर टेम्पोला ट्रकने धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे.

या भीषण अपघातात चार भाविक ठार झाले असून चारही भाविक 23 ते 30 वयोगटातील असल्याचे समजते आहे.

हा अपघात सोमवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास घडला आहे.

सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन  नाशिकला परतत असताना हा अपघात झाला.

भाविकांच्या आयशर टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने गाडी रस्त्यात असलेल्या गतीरोधकाजवळ उभी केली होती.

मात्र मागून भरघाव वेगात येत असलेल्या ट्रकने या टेम्पोला धडक दिली.

इतर जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *