Jaimaharashtra news

ठाण्यात ट्रकची आणि दुचाकीची भीषण धडक; माय-लेकीचा मृत्यू

ठाणे येथील भाईंदर पाडा परिसरात ट्रक आणि दुचाकीत धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आई आणि 3 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्देवी अंत झाला. लीलावती विश्वकर्मा असे आईचे नाव असून प्रांजळ असे 3 वर्षाच्या चिमुरडीचे नाव आहे. ट्रक चालकाने भारधाव वेगात ट्रक चालवल्यामुळे दुचाकीला धडकली आणि हा अपघात झाला.

नेमकं काय घडलं ?

दिलीप विश्र्वकर्मा आपल्या दुचाकीवरून पत्नी आणि मुलीसह राहत्या घरी जात होते.

त्याच वेळी घोडबंदर रोडवर भाईदर पाडा या ठिकाणी एक भरधाव ट्रॅकने या दुचाकीला घडक दिली.

या अपघातात माय लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर दिलीप विश्र्वकर्मा गंभीर जखमी झाला.

कासारवडवली पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

Exit mobile version