ट्रम्प-मोदी यांच्यात फोनवरून चर्चा

कोरोनाचा फटका जगाला बसला असताना आता परिस्थिती पुर्ववत करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. अमेरिका आणि भारत दोघे मिळून कोरोनाशी लढू, असं अमेरिकेचे ट्रम्प यांनी म्हटलं आहे. यासाठी दोन्ही देशांच्या ताकदीचा वापर करू, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी दिला.

मोदींनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. आमच्यात चर्चा झी. कोरोनाला हरवण्यासाठी अमेरिका आणि भारत पूर्ण तयारीनिशी लढणार आहे, असा विश्वास आम्ही एकमेकांना दिला.

गेल्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग देशात खूप वेगाने पसरला आहे. आता कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजारांच्या पार गेला आहे. अमेरिकेतही लाखो लोक कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे दोन्ही देशांनी एकमेकांना मदतीचा विश्वास दिला आहे.

Exit mobile version