Tue. Oct 26th, 2021

‘इराणने खूप मोठी चूक केली’ ट्रम्प यांचा इशारा!

अमेरिकेचे हेरगिरी करणारे शक्तीशाली ड्रोन इराणने पाडले. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक शब्दांत इशारा देणारं Tweet केलं आहे. ‘अमेरिकेचं ड्रोन पाडून इराणने खूप  मोठी चूक केली आहे’, असं Tweet मध्ये ट्रम्प यांनी लिहिलं आहे.

इराणने अमेरिकेचं ड्रोन पाडल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात Donald Trump यांनी Twitter वर दिलेली प्रतिक्रिया आणखी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करणारी आहे.

नेमकं काय घडलं ?

MQ-4C ट्रायटन हे अमेरिकेचं ड्रोन इराणने हॉर्मूज जवळ पाडले.

त्यावर इराणने मोठी चूक केली आहे असे tweet करत डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला.

हे Tweet अमेरिका इराणवर कारवाई करण्याचे संकेत मानले जात आहे.

यापूर्वी आर्थिक बंधने आणि त्यानंतरच्या टँकरवरच्या हल्ल्यामुळे इराणच्या आखाती क्षेत्रात तणावपूर्ण परिस्थिती होती.

अशातच इराणने केलेल्या कारवाईने अमेरिका संतापली आहे.

या दोन्ही देशात सध्या तणावाचे वातावरण असून आमचे सैन्य युद्धासाठी तयार असल्याचे इराणच्या लष्कर प्रमुखांनी वक्तव्य केले आहे.

MQ-4C ट्रायटन हे अमेरिकेचे सर्वात शक्तीशाली ड्रोन आहे.

हे ड्रोन ३० तासांपेक्षा जास्त वेळ 56 हजार फूट उंचीवर उडण्यास सक्षम आहे.

शिवाय ड्रोनमधील सेन्सरमुळे फुल मोशन व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.

या ड्रोनची लांबी 50 फूट असून पंखांची लांबी 130 फूट आहे.

ड्रोनमध्ये ३68 मैल प्रति तास या वेगाने धावण्याची क्षमता आहे.

हा हल्ला सामान्य मिसाईलने करणे शक्य नसल्याने यामागे रशियाचा काही संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण ईराणकडे असणाऱ्या रशियन S-300 सिस्टमनेच या ड्रोनला पाडले जाऊ शकते. अमेरिकेचे हे ड्रोन पहिल्यांदाच पाडले गेल्याने अमेरिकाचा संताप अनावर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *