Sat. Jun 6th, 2020

दीदींना मोठा धक्का; तृणमूलचे 60 नगरसेवक भाजपात

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे 60 नगरसेवक तर दोन आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याचे समोर आले आहे. तसेच माकप पक्षाच्या एका आमदाराने सुद्धा भाजपात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे. तृणमूल कॉंग्रेसचे 60 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.

मोदींनी केलेला दावा खरा ?

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तृणमूल कॉंग्रसेचे 40 आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याचे म्हटलं होता.

मोदींनी यावेळी तृणमूल कॉंग्रेसचे 40 आमदार माझ्या संर्पकात असल्याचे म्हटलं होतं.

तसेच लोकसभा निवडणुका भाजपा जिंकल्यानंतर तृणमूल कॉंग्रेसचे 40 आमदार आपली पार्टी सोडून भाजपात प्रवेश करणार असंही म्हटलं होतं.

तृणमूल कॉंग्रेसला मोठा फटका –

लोकसभा निवडणुकीत भाजपाने चांगली कामगिरी बजावली असून एनडीएने 354 जागा जिंकल्या.

पश्चिम बंगालमध्ये सुद्धा यंदा अधिकाधिक जागा जिंकल्यामुळे तृणमूल कॉंग्रेसला खत्रा दिसू लागला आहे.

मात्र मंगळवारी तृणमूल कॉंग्रेसचे 60 नगरसेवक आणि दोन आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे.

तसेच माकप पक्षाचे एक आमदार भाजपात प्रवेश केल्याचे समोर आले आहे.

दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

यामध्ये मुकुल रॉय यांचे पुत्र सुभ्रांशू रॉय यांचाही समावेश आहे.

त्यामुळे तृणमूल कॉंग्रेसचे अध्यक्ष ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसल्याचे म्हटलं जात आहे.

त्याचबरोबर ममता बॅनर्जी यावर भाजपाला काय उत्तर देतील ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *