Sun. Jun 13th, 2021

तृप्ती देसाईंना शिर्डी प्रवेशा पुर्वीच पोलिसांनी घेतलं ताब्यात

TRUPTI DESAI ARRESTED IN SHIRDI

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर: शिर्डी देवस्थानानं ड्रेसकोडसंबंधी लावण्यात आलेल्या बोर्डविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येऊन साई संस्थानाने लावलेला आवाहनाचा फलक काढण्याचा इशारा दिला होता. तृप्ती देसाईंच्या या भूमिकेविरोधात ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतलं.


अहमदनगर पोलिसांनी सुपा टोलनाका परिसरातून ताब्यात घेतलं आहे. त्यांना सध्या सुपा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. दरम्यान, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. तर दुसरीकडे तृप्ती देसाईंना ताब्यात घेतल्यानं शिर्डीत फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.


“मंदिरातले पुजारी अर्धनग्न असतात मग भक्तांच्या कपड्यांवर निर्बंध का घातले जात आहेत?” असा प्रश्न तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला विचारला होता. “मंदिरात प्रवेश करताना कोणत्या प्रकारचे कपडे असले पाहिजेत त्याचं भान भक्तांना आहे. शिर्डी येथील मंदिर आवारामधील महिलांच्या वेशभूषेबाबत जो बोर्ड लावण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही तिथे जाऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. तो बोर्ड लवकरात लवकर लवकर हटवला जावा, अन्यथा आम्ही आणखी तीव्र लढा उभारणार,” असा इशारा तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.


तृप्ती देसाई यांनी याआधी महिलांचा शनी मंदीर, हाजीअली दर्गा आणि शबरीमला मंदीर प्रवेशासाठी तीव्र आंदोलनं केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *