Sat. Oct 1st, 2022

पोलीस संरक्षणात कीर्तन होणं हीच माझी दहशत- तृप्ती देसाई

हभप इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्यावरून राळ उठल्यावर त्यांचं कोल्हापूर येथील कीर्तनही रद्द करावं लागलं. अंनिसने केलेल्या विरोधामुळे हे कीर्तन तात्पुरतं रद्द केल्याचं सांगण्यात येतंय. मुलांच्या जन्मासंदर्भातील ऑड-इव्हन फॉर्म्युला सांगणाऱ्या इंदुरीकर महाराजांविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर कीर्तनांसाठी येतानाही इंदुरीकर महाराजांच्यासोबत बांऊसर्स होते. त्यानंतरच्या कीर्तनांनाही पोलीस बंदोबस्त करण्यात आला. यासंदर्भात तृप्ती देसाई यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. ‘PCPNDT आणि सायबर सेलने जरी सध्या इंदुरीकर महाराजांना दिलासा दिला असला, तरी कीर्तनं सध्या पोलीस बंदोबस्तात करावी लागतात, हीच तृप्ती देसाईंची दहशत आहे’ असं या पोस्ट्समध्ये त्यांनी म्हटलंय.

‘सातत्याने महिलांचा अपमान करणं, पांचट भाषा वापरणं हे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाची पद्धत असल्याचं म्हणत कीर्तनकार कसे असतात, याची व्याख्याच जिथे करवत नाही, ते कीर्तन इंदुरीकरांचे’ असंही या पोस्टमध्ये म्हटलंय.

इंदुरीकरांच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांच्या मनात आपल्याबद्दल असलेली भीती म्हणजेच आमचा आक्रमक आवाज योग्य दिशेने सुरू असल्याची प्रचिती असल्याचं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

‘सध्या अनेक कीर्तनामध्ये आयोजकांना बाऊन्सर देऊन कीर्तनकाराला प्रोटेक्शन द्यावे लागते आणि पोलीस बंदोबस्तात कीर्तन करावे लागते, युट्युब वरील स्वतःचेच व्हिडीओ डिलीट करावे लागतात, इथेच तर आम्ही अर्धी लढाई जिंकलो.

सध्या कीर्तनाचे व्हिडिओ शूटिंग काढायला परवानगी नाही तसेच चॅनलच्या प्रतिनिधींना सोडले जात नाही कारण जुन्या सवयी लवकर मोडणार नाहीत आणि जर काही चुकीचे आपण बोललो तर तातडीने कारवाई होऊ शकते ही भीती म्हणजेच आमचा आक्रमक आवाज योग्य दिशेने सुरू आहे, याची आलेली प्रचिती.’ असं या पोस्टमध्ये स्पष्ट केलंय.

#अर्धी #लढाई #तर #आम्ही #इथेच #जिंकली…..कीर्तनकार कसे असतात? याची व्याख्याच जिथे करवत नाही ते कीर्तन म्हणजे…

Posted by Trupti Desai on Wednesday, February 26, 2020

आपल्या पोस्टमध्ये आपली बाजू स्पष्ट करतानाच आपली बदनामी करणाऱ्यांवरही देसाई यांनी टीका केली आहे. ‘फेसबुक वर माझ्या पोस्टला आईवरून शिव्या देणारे आणि खालच्या पातळीवर जाऊन बोलणाऱ्यांवरूनच त्यांच्या गुरुंची शिकवण लक्षात येते’ अशा शब्दांत तृप्ती देसाईंनी सुनावलं आहे. तसंच पोस्टच्या शेवटी स्वामी विवेकानंदांचं भाष्य उद्धृत करतानाच ‘आगे आगे देखो- होता है क्या?’ असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.