Sun. Apr 21st, 2019

थेट कोची विमानतळावरून तृप्ती देसाईंची फोनवरून प्रतिक्रिया

0Shares

शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी आज भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल झाल्या आहेत. तृप्ती देसाईंना विरोध करण्यासाठी शेकडो केरळवासियांनी कोची विमानतळावर गर्दी केली.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही शबरीमाला मंदिरात महिला प्रवेशाला केरळवासियांकडून कडाडून विरोध होत आहे. मंदिर प्रवेश करताना तृप्ती देसाईंना संरक्षणाचं आश्वासन केरळ सरकारकडून देण्यात आलं होते. त्यानुसार कोची विमानतळावर उतरल्यावर तृप्ती देसाईंना सुमारे 150 पोलिसांचं संरक्षण देण्यात आले आहे. तृप्ती देसाई यांच्याशी आम्ही फोनवरुन प्रतिक्रिया जाणून घेतल्या ते ऐकूया…

महिलांच्या प्रवेशास विरोध करणाऱ्यांनी विमानतळाबाहेर गर्दी केल्याने तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच थांबावे लागले आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तृप्ती देसाई यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहीले होते. तसेच मंदिर प्रवेशादरम्यान आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी विनंतीही त्यांनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *