Wed. Jun 26th, 2019

‘मी करणार शबरीमला मंदिरात प्रवेश’ – तृप्ती देसाई

0Shares

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई 17 तारखेला शबरीमला मंदिरात प्रवेश करणार आहेत. त्यासाठी त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि डिजीपींना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली आहे.

जोपर्यंत दर्शन घेत नाही तोपर्यंत परत येणार नाही अशी भूमिका तृप्ती देसाई यांनी घेतली आहे. शबरीमाला मंदिर प्रवेश याचिकेवर तातडीनं सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला असून त्याची सुनावणी आता 22 जानेवारीला होणार आहे.त्यामुळे भूमाता ब्रिगेडने हा निर्णय घेतला आहे. तृप्ती देसाईंसोबत सहा महिलाही असणार आहेत.

तृप्ती देसाई यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार की नाही हा आता मोठा प्रश्न आहे. 11 नोव्हेंबरला तृप्ती देसाई उपस्थित राहतील तेव्हा काय होणार हे पाहणे? महत्त्वाचे ठरणार आहे.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: