Tue. Oct 19th, 2021

‘अण्णांच्या मागण्या मान्य करा अन्यथा …’ – तृप्ती देसाई

लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी व्हावी तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हावे यासाठी गेल्या सात दिवसांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसले आहे. मात्र सरकार त्यांच्या मागण्यांना दुर्लक्ष करत असल्याचे अण्णांनी सांगितले आहे. अण्णांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र आता भूमात महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनीही अण्णांना पाठिंबा देण्याचा व्हिडीओ जारी केला आहे.

तृप्ती देसाई व्हिडीओत काय म्हणाल्या ?

अण्णा उपोषण समान्यजनतेसाठी करत आहेत.

अण्णांच्या मागण्या ९ फेब्रवारी पर्यंत मान्य केल्या नाहीत तर आम्ही आंदोलन करू तसेच संघटनेच्यावतीने  मंत्र्यांच्या गाड्याही फोडण्यात येतील.

मोदींना बॉलिवूडच्या कलाकारांना भेटण्यासाठी, फोटो काढण्यासाठी वेळ आहे. मात्र अण्णांशी बातचीत करण्यासाठी वेळ नाही. हेच का अच्छे दिन ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

यापूर्वी सरकारच्यावतीने केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे आणि गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णांच्या उपोषणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तोडगा निघला नसल्यामुळे अण्णा उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच स्वामीनाथन आयोगाचा अभ्यास मंत्र्यांना नसल्याचाही आरोप अण्णांनी लावला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *