Fri. Aug 12th, 2022

भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करा; पटोलेंचे पंतप्रधानांना पत्र

रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून अनेक राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली असून भारताताली एकूण २० हजार विद्यार्थी तेथे अडकले आहेत. तर यामध्ये महाराष्ट्रातील १२०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत. पंतप्रधानांनी यात लक्ष घालून विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची मागणी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे तणावग्रस्त परिस्थिती उद्भवल्यामुळे अनेक भारतीय विद्यार्थी तेथे अडकले आहेत. त्यामुळे त्यांना मायदेशी आणण्याचा प्रयत्न करण्याची मागणी नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा प्रचारात व्यस्त आहेत परंतु त्यांनी त्यातून थोडा वेळ काढून विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नाना पटोले यांनी पत्राद्वारे पंतप्रधानांना केली आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या मुंबईतील विद्यार्थीनी चैताली हिच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी चैतालीने भारत सरकारने हालचा करत युक्रेनमधून मायदेशी परतण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन चैतालीन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.