Sat. Aug 13th, 2022

नवी मुंबईपाठोपाठ पुण्यातूनही तुकाराम मुंढे हटवाची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुण्यातूनही तुकाराम मुंढे हटवाची मागणी होऊ लागली. धडाक्याच्या कामासाठी प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढेंची नवी मुंबई महापालिका आयुक्तपदावरून पायउतार करून

PMPMLच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले.

 

3 महिन्यांतच तुकाराम मुंढेंना विरोध होऊ लागला. सत्ताधारी भाजपच्या या मागणीला विरोधकांचीही साथ मिळाली.

 

शालेय बसची दरवाढ मागे घेण्यास मुंढेंनी असहमती दर्शवली. तसेच याबाबत महापौरांनी आयोजित केलेल्या बैठकीलाही मुंढे गेले नाहीत.

 

त्या बैठकीला न आल्याने संतप्त महापौरांनी, तुकाराम मुंढे यांना परत न्या अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.