Fri. Jun 18th, 2021

तुकोबा-ज्ञानोबांच्या पालखीचं आज होणार पुण्यात आगमन !

श्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांची  पांडुरंगाच्या भेटीसाठी अलंकारपुरीकडे निघालेली पालखी आज पुण्यनगरीत दाखल होणार आहे.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांची  पांडुरंगाच्या भेटीसाठी अलंकारपुरीकडे निघालेली पालखी आज पुण्यनगरीत दाखल होणार आहे. प्रथेप्रमाणे यंदाही हा पालखी सोहऴा नाना भवानी पेठेत दोन दिवस मुक्कामी असेल. हा नेत्रदीपक सोहऴा पाहण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. त्यासाठी पुण्यातील वाहतुक व्यवस्थेमध्येही बदल करण्यात आले असून कडेकोट बंदोबस्ताची योजना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून करण्यात आली आहे.

कसा असेल कार्यक्रम?

पुणे-मुंबई रस्त्यावरील कमलनयन बजाज उद्यान येथे प्रथेप्रमाणे यंदाही दोन्ही पालख्यांच्या आगमनानंतर स्वागत करण्यात येतंय. आहे.

यानंतर  अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, गणेशखिंड रस्ता, फर्ग्युसन रस्ता, डेक्कन, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता

याठीकाणी पालखी सोहळा मुक्काम करण्यासाठी पोहोचेल.

नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असेल.

भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असेल.

काल संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आळंदीहून पंढरपुरला आपले प्रस्थान ठेवलंय.

हरिनामाच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरासह अलंकारनगरी न्हाहून निघाली.

तसेच या देखण्या पालखी प्रस्थान सोहळ्यात राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनीही आपली उपस्थिती दर्शवली आणि माऊलींचा आशिर्वाद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *